अक्कलकोट – तालुक्यातील रुद्देवाडी येथील ओंकार साखर कारखाना शेतकऱ्यांना न्याय देणारे असून प्रामाणिकपणे काम करीत आहे. आता शेतकऱ्यांनीही आपली जबाबदारी नीट पार पाडावी. ऊस पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतरच तोडणी करावी, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक वजन मिळेल व कारखान्याला चांगली रिकव्हरी मिळेल. यासोबतच ६ फूट अंतरावर ऊस लागवड करावी व पाचट जाळू नये असे काशी पीठ ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ, आशीर्वाचनात प्रतिपादन केले.
तालुक्यातील रुद्देवाडी येथील ओंकार साखर कारखाना येथे काशी पीठ ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री.श्री.श्री. १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ, श्री. ष. ब्र.निळकंठ शिवाचार्य महास्वामीजी गुरुसंस्थान हिरेमठ मैंदर्गी, श्री.म.नि.प्र. शिवबसव राजेंद्र महास्वामीजी, विरक्त मठ खेडगी, श्री.ष.ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर,श्री.म.नि.प्र. डॉ.श्री. शांतलिंगेश्वर महास्वामीजी, विरक्त मठ दुधनी यांच्या पावन उपस्थितीत व शुभहस्ते विधीवत साखर पोतेचे पूजन करण्यात आला.यावेळी आशीर्वाचन प्रसंगी काशीपीठ जगद्गुरू यांनी ओंकार साखर कारखानाचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. शेतकऱ्यांना न्याय देणारे असे साखर कारखाने अधिकाधिक वाढावेत अशी त्यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
ओंकार ग्रुपअंतर्गत एकूण २१ साखर कारखाने कार्यरत असून, रुद्देवाडी येथील ओंकार साखर कारखाना हा १५ वा युनिट आहे.सर्व कारखान्यांमध्ये शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत लवकरात लवकर पूर्ण पेमेंट व जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे धोरण सातत्याने राबवले जात आहे. ओंकार ग्रुपची ही भूमिका केवळ उद्योगपुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठीचा एक सकारात्मक व आदर्श प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.गळीत हंगाम २०२५-२६ चे गाळप सुरू होताच ओंकार ग्रुपने शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत ऊस बिलापोटी तब्बल २२ कोटी रुपयांचे पेमेंट अदा केले आहे. यंदाच्या हंगामात अक्कलकोट तालुक्याच्या इतिहासातील सर्वोच्च रु.३०००/- मार्च नंतर ३१०० व एप्रिलनंतर ३२०० ऊस दर देण्याचा निर्णय ओंकार ग्रुपने घेतला आहे. तसेच ओंकार ग्रुपच्या परंपरेनुसार टनेज नुसार दीपावलीला मोफत साखर देण्यात येत असल्यांची जनरल मॅनेजर अभयसिंह मानेदेशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना केले व श्री. व्ही. एम. गायकवाड जनरल मॅनेजर यांनी सर्व संत-महंत, मान्यवर, शेतकरी बांधव, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले.
अक्कलकोट तालुक्यामध्ये तडवळ आणि रुद्देवाडी (दुधनी) येथे ओंकार ग्रुपचे दोन साखर कारखाने कार्यरत असून, या दोन्ही कारखान्यांमध्ये दैनंदिन सुमारे ११ हजार मे.टन ऊस गाळप केले जात आहे. दोन्ही कारखान्यांवर सध्या गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस उपलब्ध होत आहे. जॅमिंगची परिस्थिती निर्माण होत असली तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये किंवा ऊस घालण्याची घाई करू नये, तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याची जबाबदारी ओंकार ग्रुपची आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही,
– चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील

















