सोलापूर – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हा मुख्य प्रवक्तेपदाची व माध्यम समन्वयकाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कदम यांची निवड जाहीर केली. जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवड करण्यात आली आहे. कदम यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विरोधात असतानाही पक्षाच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाची बाजू मांडण्यासाठी त्यांची प्रवक्तेपदाबरोबरच माध्यम समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दृढ विश्वास,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मार्गदर्शन आणि जिल्हाध्यक्ष उमेश् पाटील यांचे पाठबळ यामुळेच आपण पक्षामध्ये चांगले काम करू शकलो असल्याची भावन निवडीनंतर कदम यांनी व्यक्त केली.



















