सोलापूर : कुमठा नाका परिसरातील हुडको येथे राहत असलेल्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी रात्री 1.30 वाजता उघडकीस आला.
ओमप्रकाश शशीकांत बनसोडे (वय 40 ,रा. हुडको कॉलनी, कुमठा नाका, सोलापूर) असे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ओमप्रकाश याने राहत्या घरातील पंख्याला साडीने गळफास घेतला.
ही बाब लक्षात येताच, नातेवाईकांनी त्याची गळफासातून सोडवणूक केली. त्यानंतर हवालदार राठोड यांनी उपचारास दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.