सोलापूर – नॅब संचलित सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे लुईस ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली. नॅब संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांच्या शुभहस्ते लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंधकार्यशाळेचे अधिक्षक रामचंद्र कुलकर्णी होते. तसेच ममता मूकबधिर विद्यालयाचे कलाशिक्षक नरेंद्र वाघमारे उपस्थित होते.
यावेळी कार्यशाळेचे प्रमुख रियाज मुल्ला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थी मनोगतामध्ये पवित्रा कुरणे व नामदेव चामलवाड यांनी लुई ब्रेलसाठी गीत गायले. प्रकाश काळे यांनी लुईस ब्रेल यांच्या कार्याविषयी विस्तृतपणे माहिती सांगितली. लुईसरेल यांच्या जयंतीच्या औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा व गायन स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवकुमार पाटील तर आभार प्रकाश काळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शुभम वांझरे यांचे सहकार्य लाभले.

























