पिलीव – माळशिरस तालुक्यासह, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी यंदाच्या गळीत हंगामात ऊस दर जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत. ऊस दर जाहीर करुनच साखर कारखाने सुरू करावेत अशी निवेदने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यातील सर्व कारखान्यास दिली होती परंतू एकाही कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही.उलट चांगला दर देणार असे म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक करीत गळीत हंगाम नेटाने सुरू केला आहे.
यामुळे माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असुन ऊस दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता पुणे _ पंढरपूर व पिलीव _ निमगाव या मार्गावरील ऊस वाहतुक करणारी वाहने अडवित वाहतूक बंद पाडण्यात आली.जोपर्यंत साखर कारखाने ऊस दर जाहीर करीत नाहीत तोपर्यंत कारखान्याकडे ऊस वाहतूक होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला.यामुळे या दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.राज्यातील सोलापूर जिल्ह्य व माळशिरस तालुका सोडुन पुणे,कोल्हापूर, सातारा,सांगली या लगतच्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पहीला हप्ता जाहीर करुनच गळीत हंगाम सुरू केला आहे.पण ज्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 38 साखर कारखाने आहेत. त्यापैकी एकाही साखर कारखान्यानी ऊस दर जाहीर केलाच नाही.
माळशिरस तालुक्यातील साखर कारखानदारांनी ताबडतोब ऊस दर जाहीर करावा अन्यथा ऊस वाहतूक तर रोखुच पण कारखान्याचे प्रवेशद्वारच बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहु नये .
सोलापूर जिल्ह्य़ात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमुळेच सहकार चळवळ मोठी झाली आहे.या जिल्ह्यात कारखानदारीच्या जिवावर राजकारण सुरू आहे.कारखान्याच्या जिववावरच राजकारण सुरू आहे.इतर जिल्ह्यात कोणतीही प्रकल्प नसताना चांगला दर देतात माञ या जिल्ह्यात खुप जुने कारखानदार सुद्धा चांगला दर देत नाहीत. या जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसाला 4000 दर द्यायलाच पाहीजे _ अजित बोरकर, तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना ,माळशिरस.
माळशिरस तालुक्यातील निमगाव पाटी येथे ऊस दरांसाठी ऊस वाहतूक रोखताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.



















