तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
वडीगोद्री मराठवाड्यातील विद्यार्थांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेची संवाद यात्रा ही संध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. दिनांक 23/08/2024 रोजी वार शुक्रवारी ही संवाद यात्रा वडिगोद्रीत येत आहे. वडिगोद्रीत सर्व शाळानां व महाविद्यालय यांना भेट व संवाद सांगणार आहे. सकाळी 11 वाजता स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सौरभ राजु शेठ्ठी विद्यार्थ्यांशी सवांद साधणार आहेत.
शाळा महाविद्यालय, विद्यारीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे प्रश्न शासन दरबारी उपस्थित करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद पाठपुरावा करणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाी या संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान मराठवाडा अध्यक्ष गणेश पांडुरंग गावडे, जिल्हाअध्यक्ष विशाल ढेबे, जिल्हाउपाध्यक्ष सोपान उगले,युवा तालुका कार्यध्यक्ष गोपाल खोमणे, प्रदिप खोसे, सुनिल गायकवाड यांनी केले आहे.दरम्यान,या सवांद यात्रेची जय्यत तयारी झाली असल्याचे सांगितले.