मोडनिंब – मोडनिंब (ता. माढा) येथील शिवाजीनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत व मोठ्या दिमाखात पार पडला.मोडनिंब शहरात पहिल्याच श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना होत आहे. विद्यानगरी सोसायटीमध्ये हे भव्य स्वामी मंदिर उभारण्यात आले आहे. या सोहळ्याचे यजमानपद वैशाली व कैलास तोडकरी आणि कस्तुरी व मंगेश पुरवत या दाम्पत्यांकडे होते. तर पौरोहित्य पंढरपूर येथील संजय ताठे गुरुजी यांनी केले. बालयोगी सुखदेव महाराज बाडर्डीकर यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले.
शिवाजीनगर वसाहतीतील वसाहतीतील विद्यानगरी सोसायटी येथे या भव्य स्वामी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मोडनिंब शहर व परिसरातील स्वामी भक्तांच्या पुढाकाराने व देणगीतून या मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. सुमारे सतरा लाख रुपये देणगी जमा झाली.माजी सरपंच कैलास तोडकरी यांनी जयपूर येथून आणलेली सुमारे एक टन वजनाची संगमरवरी मूर्ती बसविण्यात आली.
यावेळी प्रमुख देणगीदार कैलास तोडकरी, मंगेश पुरवत व डॉ. अनिल गोळवलकर,यासह देणगीदारांचा सन्मान करण्यात आला. सुमारे तीन वर्षांपासून संकल्पित असलेल्या या मंदिरासाठी विद्यानगरी सोसायटीचे अध्यक्ष प्रा. अशोक गोवे, सचिव जयवंत समुद्र, अनिल शिंदे, शहाजी चव्हाण, मोहन शिंदे, गंगाधर कोळी, राजेंद्र तोडकरी राजाभाऊ भोसले व इतर सहकाऱ्यांनी अपार मेहनत घेतली. रविवारी शहरातून निघालेली शोभायात्रा व आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
पंचायत समितीचे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, रमेश महाराज वसेकर, बाबुराव सुर्वे, कुरण गिड्डे, बालाजी पाटील, ऍड. गणेश सुर्वे, दत्तात्रय सुर्वे, राहुल गांधी, वैभव मोरे,निलेश गिड्डे, विजयकुमार नामदे,दत्तात्रय शिंदे, सत्यनारायण गिड्डे,आर. बी. पाटील, डॉ. संजय लोखंडे, राजेश निंबाळकर, राहुल गडेकर आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवून स्वामी चरणी नतमस्तक झाले.
मोडनिंबच्या शिवाजीनगर येथील विद्यानगरी सोसायटीतील नवीन श्री स्वामी समर्थ मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखात पार पडला. तोडकरी आणि पुरवत परिवार यजमान होते. संजय ताठे गुरुजींनी विधी, तर बालयोगी सुखदेव महाराजांनी कलशारोहण केले. सुमारे १७ लाख देणगीतून मंदिर उभारले असून भाविक व मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.

























