अक्कलकोट – अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर अवतरलेले आहेत. अशा या अवलियाची सेवा करणे हे मानवी जीवनाचे परमभाग्य असते, स्वामी कृपेने ही सेवा मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या जीवन कार्यास लाभलेली आहे. जीवनातील कोणत्याही सात्विक सेवेपेक्षा स्वामी सेवेचे हे कार्य खूप महान आहे, म्हणून स्वामी सेवेचे मूल्यमापन कोणत्याही सेवेशी करता येत नाही असे मनोगत मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी व्यक्त केले
. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांची आरती करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी अभिनेत्री श्रेया बुगडे
यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन सन्मान केला. यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे बोलत होत्या. याप्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, व्यंकटेश पुजारी, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, सागर गोंडाळ, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.
आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कॉमेडी एक्स्प्रेस या विनोदी मराठी मालिकां मधून श्रेया बुगडे हे नाव अल्पावधीत घराघरांत पोहोचलं. तब्बल दहा वर्षे या शो नं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या पुढेही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं त्यांचं हे काम अविरतपणे सुरु रहावे याकरीता श्रेया बुगडे यांचा आज सन्मानाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा. – प्रथमेश इंगळे, युवा नेतृत्व – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट)
फोटो ओळ – अभिनेत्री श्रेया बुगडे यांचा देवस्थानमध्ये सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.


















