मुक्रमाबाद / नांदेड – महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्याकडून करण्यात आले होते. यावेळी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन सभेच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
या अभिवादन सभेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे माजी प्र. प्राचार्य प्रा.डॉ.रमाकांत बिडवे उपस्थित होते. या सदर सभेचे प्रास्ताविक डॉ.आर.बी.मादळे यांनी केले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रवींद्र बाविस्कर व प्रा.भारतभूषण बाळबुधे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. व बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीला जगण्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याविषयी माहिती दिली.
व्यासपीठावर डॉ.सय्यद मौलाना, ग्रंथपाल डॉ.विलास पवार, डॉ. सूर्यकांत सकनुरे, उपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.मारोती गायकवाड यांनी मानले. या अभिवादन सभेसाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























