सोलापूर – शालेय सतरा वर्षाखालील हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटाचे विजेचे पद मोहोळच्या नागनाथ विद्यालयाने तर मुलांच्या गटात सोलापूरच्या श्री स्वामी विवेकानंद प्रशालेने पटकावले.
मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर डिव्हिजनल स्पोर्ट्स असोसिएशन सोलापूर व ऑल इंडिया एस टी एस सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त व विद्यमाने संविधान दिनानिमित्त आयोजित. मुलींच्या गटातील अंतिम सामना नागनाथ विद्यालय मोहोळ च्या संघाने श्री स्वामी विवेकानंद प्रशालेचा 25- 15/ 25 -22 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
मुलांच्या गटात श्री स्वामी विवेकानंद प्रशालेने रोशन प्रशाला सोलापूर संघाचा 25- 20/ 25 -18 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजय संपादन केला. स्पर्धेचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलींच्या गटात कार्तिकी गरगडे, मुलांच्या गटात मयूर चंचू यांनी मिळविला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे क्रीडा अधिकारी श्री आदित्य त्रिपाठी यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूरचे सचिव श्री किशोर पिल्ले ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्पलॉइज सोलापूर असोसिएशनचे सचिव श्री सचिन बनसोडे, श्री सुदेश मालप ,श्री अनिल यरगल, सौ जय लक्ष्मी मुकुंद, श्री मारुती जान गवळी श्री सचिन बनसोडे यांच्या मातोश्री बनसोडे मॅडम, श्री स्वामी विवेकानंद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नारायणकर सर श्री माने सर, श्री शिंदे सर इंगळगी सर आदी मान्यवर उपस्थित होते
या स्पर्धेसाठी सुदेश मालप व अनिल यरगल यांनी आपले वडील व रेल्वेचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू वीरभद्र रेगळ व मध्य रेल्वे चे माजी कोच हिमायत अली शेख यांच्या स्मरणात पुरस्कृत केलेल्या प्रथम तीन क्रमांकाच्या टॉकीज व सचिन बनसोडे यांनी आपले वडील सी के बनसोडे यांच्या स्मरणात पुरस्कृत केलेले वैयक्तिक बक्षिसे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते खेळाडूंना प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेतील मुले व मुली दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे रुपये 5000, 3000 व 2000 रोप पारितोषिक दिविजनस स्पोर्ट्स असोसिएशन मध्य रेल्वे सोलापूर यांच्यातर्फे प्रदान करण्यात आली या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून श्री राघवेंद्र , यासीर तांबोळी, वेदांत तकाकुल, संपत , शहाबाज कुरेशी म्हणून कार्य केले.

























