💁♀️ राज्यात स्वाइन फ्लूच संकट उभं राहील आहे. नाशिकमध्ये स्वाइन फ्लुचा शिरकाव झाला आहे. स्वाइन फ्लु मुळे एका महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. तर आणखी तीन रुग्ण समोर आले आहेत. स्वाइन फ्लुचे रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
👉🏻 लक्षणे काय?
▪️ ताप
▪️ डोकेदुखी
▪️ अंगदुखी
▪️ घसादुखी
▪️ खोकला
▪️ थकवा
▪️ जुलाब
▪️ उलटी
👉🏻 या गोष्टी करा :
▪️ वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा
▪️ पौष्टिक आहार घ्या
▪️ लिंबू आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या आहारात वापरा.
▪️ धूम्रपान टाळा
▪️ पुरेशी झोप व विश्रांती घ्या
▪️ भरपूर पाणी प्या
▪️ खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवा.
👉🏻 या गोष्टी करू नका :
▪️ कोणत्याही व्यक्तीसोबत हात मिळवू नका
▪️ सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
▪️ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
▪️ गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
▪️ संशयित रुग्णांच्या संपर्कात जाऊ नका
▪️ लक्षणे आढळल्यास मुलांना शाळेत पाठवू नका.