लातूर – राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणाऱ्या दर्जाहीन सोयाबीन बियाणामुळे भेडसावणाऱ्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी इंडोसोया डेव्हलपमेंट असोसिएशन (ISDA) च्या शिष्टमंडळासह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत बियाण्यांच्या गुणवत्तेवर नियंत्रण आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य वेळेत दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत. यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
राज्यातील अनेक ठिकाणी दर्जाहीन सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत गांभीर्याने चर्चा केली. यानंतर कृषीमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पुढील धोरणात्मक सुधारणा करण्याचे निर्देश दिले.प्रथम सत्यता दर्शक सोयाबीन बियाण्यांची तपासणी प्रणाली अधिक काटेकोर आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत बियाणे प्रयोगशाळा पडताळणी आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार आहे.व बियाणे नियंत्रण यंत्रणेची संपूर्ण पुनर्रचना करून तिचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे महत्वपुर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले.
कृषी विद्यापीठांकडून पुरवठा होणाऱ्या ब्रिडर सोयाबीन बियाणाच्या पुरवठा प्रणालीतील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच बियाणे निरीक्षण आणि अंमलबजावणी समितीचे सक्षमीकरण करून या समितीला अधिक अधिकार आणि जबाबदारी दिली जाणार आहे. कृषी विद्यापीठांकडील सोयाबीन पिकांचे बियाणे इंडो सोया च्या सभासद शेतकऱ्यांना व उत्पादक कंपनीसाठी राखीव कोठा ठेवला जाणार आहे. भविष्यामध्ये या कंपन्याकडून प्रमाणित बियाण्याच्या उत्पादनासाठी याचा उपयोग केला जाणार आहे.
आ. अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च ठेवून राज्य सरकारने ठोस धोरण तयार होण्याची अपेक्षा या बैठकीदरम्यान व्यक्त केली. बैठकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आणि तातडीने अंमलबजावणीसाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आमदार पवार यांनी कृषिमंत्री तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.या मुळे राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा सुलभ आणि विश्वासार्ह होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















