सोलापूर – आदित्य उर्फ छोटया आद्या शिवाजी भोसले याला सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहेत.
आदित्य उर्फ छोटया आद्या शिवाजी भोसले, वय-२६ वर्षे, रा. ०६, शिवमंदिर जवळ, गडदर्शन, औसे वस्ती, लक्ष्मी पेठ, दमाणी नगर, सोलापूर याचेविरुध्द सन २०१८, २०२३ व २०२५ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, सामान्य नागरीकांना साथीदारांसह मारहाण करुन दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.



























