Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूरात सभापतीपदी शुभम आगावणे तर उपसभापतीपदी देशमुख

तरुण भारतbyतरुण भारत
March 13, 2026
in editor
0
पंढरपूरात सभापतीपदी शुभम आगावणे तर उपसभापतीपदी देशमुख
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – पंचायत समितीच्या सभापतीपदी परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे डाँ.शुभम सुरेश आगावणे तर उपसभापतीपदी वसंतराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमोद देशमुख यांची निवड झाली. दरम्यान आजच्या निवडीमुळे गेल्या चाळीस वर्षापासून पंचायत समितीवर असलेल्या परिचारकांच्या सत्तेला यंदा सुरुंग लावण्याचे आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांनी पाहिलेले स्वप्न अखरे सत्यात न उतरता ते केवळ स्वप्नच राहिले.


पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्या प्रमाणे गुरुवारी (दि.१२ मार्च) पंचायत समितीच्या कार्यालयात येथील प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली.


दरम्यान या निवडणूकीच्या निमित्ताने अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे पहावयास मिळाले. या निवडणूकीत परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एकमेकांना साथ देत सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक आपल्या बाजूने केली.
————————

राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ या चिन्हावर पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक जागा लढविल्या गेलेल्या होत्या. तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते तथा विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके हे अभिजीत पाटील यांच्या समवेत या निवडणूकीत सक्रीय सहभागी झालेले होते. त्यामुळे निवडणूक निकाला नंतर परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाला ८ तर आमदार अभिजीत पाटील व भालके यांना ८ जागांवर समाधान मानावे लागलेले होते. त्यामुळे पंचायत समितीची सत्तास्थापन करताना परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाला अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांची गरज भासेल असा तर्क तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जाणकारांकडून वर्तविला जात होता. मात्र परिचारकांनी अखरेची खेळी करीत आपले जुने सहकारी ( मात्र मधल्या काळापासुन परिचारकांशी काहीसे अंतर ठेवून असलेले ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्याशी संधान बांधले. त्यामुळे राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो हा प्रत्यय येथील निवडणूकीच्या निमित्ताने तालुक्याच्या जनतेला पहावयास मिळाला. 
———————-

आमदार पाटील आणि भालकेंचे स्वप्न अपुरे
दरम्यान पंचायत समितीच्या निवडणूकी पासून गेल्या चाळीस वर्षापासून पंढरपूर तालुका पंचायत समितीवर एकहाती सत्ता असलेल्या परिचारक गटाला या वेळेस सत्तेपासून दूर ठेवायचे असा चंग आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांनी बांधला होता. मात्र राजकारणात मुरब्बी असलेल्या परिचारकांनी अखेरच्या क्षणी आपले जुने सहकारी वसंतराव देशमुख यांच्याशी बोलणी केली आणि अखरेच्या क्षणी ती यशस्वी देखील करुन दाखवुन विरोधकांचे पंचायत समितीच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचे स्वप्न अक्षरश: धुळीस मिळविले. 
—————————

परिचारक, गायकवाड यांनी लिलया पेलली जबाबदारी

परिचारक गटाकडून मध्यंतरीच्या काळात काहीसे दूरावलेले वसंतराव देशमुख यांच्या बरोबर चर्चा करण्याची जबाबदारी युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारक आणि पंढरपूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांच्यावर सोपविली होती. या दोघांनीही ही जबाबदारी लिलया पेलत अखेर वसंतराव देशमुख यांचा पाठिंबा मिळविला.
———————
चौकट : ( आकड्यांचे गणित पालटले )

दरम्यान देशमुखांचा पाठिंबा मिळवित असताना वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव पंचायत समितीच्या गणातून विजयी झालेले प्रमोद देशमुख यांना उपसभापतीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशमुख यांच्या पाठिंब्यामुळे पंचायत समिती मधील आकड्याचे गणित जुळून आले. कारण पंचायत समितीच्या निवडणूकीत परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाला ८ जागा तर त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या आमदार अभिजीत पाटील आणि तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या भगिरथ भालके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वसंतराव देशमुख या सर्वांना मिळुन ८ जागा मिळाल्या होत्या. मात्र ऐनवेळी अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके या दोघांनाही वसंतराव देशमुख यांना आपल्या गटात खेचण्यात अपयश आले. हिच संधी साधत परिचारकांनी देशमुखांशी जुने मित्रत्वाचे नाते दृढ करीत पुन्हा एकदा एकत्रित येण्याच्या घातलेल्या सादेला अखरे यश येवुन परिचारक आणि देशमुख (भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) एकत्र आल्यामुळे त्यांची सदस्य संख्या ९ वर पोहचली तर आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांचे घोडे आठ संख्येवरच आडकून राहिले. आकड्यांचे गणित पालटल्याने परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाची पुन्हा एकदा पंचायत समितीवर सत्ता स्थापन झाली. 
——————-

विरोधकांकडून सभापती,उपसभापतीपदासाठी दाखल केले अर्ज
आमदार अभिजीत पाटील यांच्या गटाकडून पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सावली अतुल गायकवाड यांनी तर उपसभापतीपदासाठी शहाजी मुळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
————————-

निवडी नंतर एकच जल्लोष
पंचायत समिती मधील आकड्यांचे गणित पालटल्यामुळे पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे डाँ.शुभम आगावणे यांची तर उपसभापतीपदी वसंतराव देशमुखांचे विश्वासू शिलेदार प्रमोद देशमुख यांची वर्णी लागली. सभापती, उपसभापतींच्या निवडीनंतर परिचारक आणि देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी पंचायत समितीच्या आवारात ढोल,ताशांच्या गजरात गुलालाची मुक्तपणे उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.
———————

अखेर मित्रांच्या निधनानंतर देखील निभावली दोस्ती
स्व.सुरेशराव आगावणे यांनी आपल्या हयातीत संपूर्ण वेळ पक्ष पार्टीसाठी दिला होता. परिचारक कुटुंबावर नितांत प्रेम करत आपल्या श्वासाच्या शेवटपर्यंत त्यांनी परिचारक कुटुंबावरची निष्ठा जपली होती. दुर्दैवाने कोरोना कालावधी त्यांचे आकस्मित निधन झाले. कोरोना सारख्या कालावधीत प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या प्रेत यात्रेला खांदा दिला होता. आगवणे कुटुंबीयांसोबत असलेलं संबंध सुरेशराव नंतर त्यांच्या पश्चात ही जपण्याचे काम प्रशांत परिचारकांनी केले आहे. कारण खर्डी पंचायत समिती गणातून (स्व.) सुरेशराव आगवणे यांचे पुत्र डाँ.शुभम आगवणे यांना उमेदवारी देण्यापासून ते पंचायत समिती सदस्यपदावर निवडून आणे पर्यंत सर्व जबाबदारी प्रशांत परिचारकांनी पार पडली. ऐवढ्यावरच ते थांबले नाहीत तर पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदावर डॉ.शुभम आगवणे यांना विराजमान करून आपले दोस्त स्वर्गीय सुरेशराव आगवणे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिण्याचे काम प्रशांत मालकांनी केल्याची भावना पांडुरंग परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी आज बोलून दाखविली.
——————-
फोटोओळी : पंढरपूर पंचायत समितीवर आकड्यांचे गणित जुळवुन आणण्यासाठी युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांनी वसंतराव देशमुख यांच्याशी चर्चा करुन त्यांचा पाठिंबा मिळविला.

Post Views: 99
Previous Post

छोटया सोलापूर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

Next Post

‌‘मिशन लक्ष्यवेध‌’ अंतर्गत निपुणता केंद्राची प्रक्रिया सुरु;  ॲथलेटिक्स व कुस्ती या खेळांचा समावेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‌‘मिशन लक्ष्यवेध‌’ अंतर्गत निपुणता केंद्राची प्रक्रिया सुरु;  ॲथलेटिक्स व कुस्ती या खेळांचा समावेश

‌‘मिशन लक्ष्यवेध‌’ अंतर्गत निपुणता केंद्राची प्रक्रिया सुरु;  ॲथलेटिक्स व कुस्ती या खेळांचा समावेश

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1244877

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!