अंबड – अंबड दि 8 नोव्हेंबरशैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली मोहपुरी येथील त्रिमूर्ती इंग्लिश स्कूल मध्ये संस्थापक सचिव ॲड.संजय काळबंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. यात अनेक शाळेतील संघाने उस्फुर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट वक्तृत्वाचे सादरीकरण केले.
ॲड.संजय काळबंडे यांना वकृत्वाची अत्यंत आवड आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील भाषण, वकृत्वाचा अलौकिक गुण अंगीकारला पाहिजे यासाठी त्यांच्या संकल्पनेतून तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धा आयोजना मागचा हेतू यशस्वी ठरला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते व महाराष्ट्र पोलीस गुप्तचर विभागातील अधिकारी रामेश्वर मुळक यांनी आपल्या प्रभावी,हृदयस्पर्शी वकृत्वाने विद्यार्थ्यांना हसवत तर कधी अंतर्मुख होण्यास भाग पाडले. आई वडिलांचे महत्त्व, उपकार,कष्ट आणि आपली नैतिक जबाबदारी बाबत सांगताना विद्यार्थ्यांना आपले अश्रू रोकता आले नाही.
ॲड. संजय काळबंडे यांनी वक्तृत्वाचे महत्त्व बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रेमाचा वर्षाव करत शुभेच्छा प्रदान केल्या.
तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेत वर्ग पाचवी ते सातवी गटात मोहपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर वर्ग आठवी ते दहावी गटात त्रिमूर्ती इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक काळबंडे ,प्राचार्य बी.आर डोंगरे, खरात के.आर, जिल्हा परिषद प्रशाला मोहपूर येथील मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, शिक्षक आरसुळे, राम पाटील झिंजुर्डे, शिवाजी गव्हाणे,शरद सातपुते, पप्पू हेमके यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुकास्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट सूत्रसंचलन नाटकर व्ही.एल यांनी केले तर सातपुते एस. यू, शिंदे एम आर यांनी परीक्षक म्हणून मोलाची भूमिका बजावली. तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.




















