तांबे एज्युकेशन सोसायटी दहिसर मुंबई संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा ( गरड )
वाटुर प्रतिनिधी अयाज पठाण आज दिनांक 16 जुलै 2024 रोजी वार मंगळवार या दिवशी आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शाळेपासून ते वाटुर फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जालना रोड, जयपूर रोड,व मंठा रोड,वर रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीमध्ये लेझीम पथक, स्काउड -गाईड पथक,विविध पारंपारिक वेशभूषा, ( बंजारा ) वारकरी संप्रदायिक वेशभूषा,करण्यात आले होते. व झाडे लावा- झाडे जगवा अशा विविध घोषणांनी वाटुर फाटा दुमदुमून गेला. वाटुर फाटा येथील चौकात लेझीम पथक, व लेंगी डान्स,व विविध अभंग-गवळण, पावली,घेण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून वृक्षाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजयकुमार खरात सर, प्रा. मु.श्री. चव्हाण सर. पर्यवेक्षक श्री.सिरसाठ सर व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते.