धाराशिव – तांदळवाडी वाशी या रोडवर पवनचक्की चे जड वाहने व तसेच सध्या भैरवनाथ शुगर लिमिटेड तांदुळवाडी,गाळप हंगाम 25/ 26 चालू असून त्यामुळे ऊस वाहतूक ट्रॅक्टर , बैलगाडी, ट्रकची रोडवर रहदारी वाढलेले आहे.
रोड एकसमान नसल्याने चढ उतार असल्याने ट्रॅक्टर चढावर अडकतात त्यामुळे ट्रॅक्टरच्या चाकाने रोडवर गुडघ्या इतके तर तीन चार फुटाचे खड्डे पडलेले असून ,ईतर लहान चारचाकी गाड्यांचे ह्या रोड वरुन चालवणे अवघड झाले आहे.
दोन दोन ट्रॅक्टर लावून ट्रॅक्टर ओढून काढली जातात ,मोठ मोठे खड्डे तयार होतात त्यामध्ये मोटरसायकल धारक संध्याकाळी अंधारात पडल्याशिवाय राहत नाही.
तसेच ट्रॅक्टर चढवण्या साठी ट्रॅक्टर मागे सरकू नये म्हणून दगडाचा उपयोग, उटी साठी केलेला असतो ,परंतु ट्रॅक्टर पुढे निघून गेल्यानंतर तो दगड उचलला जात नाही, त्यामुळे मोटार सायकल चालकाची मोटार सायकल चालवताना संध्याकाळी दमछाक होते ,रोड कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच ट्रॅक्टर साठी दगडाचा उपयोग केला तर तो दगड उचलून रस्त्याच्या कडेला ठेवणे बंधनकारक करावे ,अशी गावकऱ्याची मागणी होत आहे.
























