सोलापूर – कै. सुरेश सखाराम सुरवसे चारिटेबल ट्रस्ट संचलित श्री चैतन्य प्रशालेतील दिनांक २६ ते ३० नोव्हेंबर २०२५ या काळात विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत आमच्या शाळे तील विद्यार्थ्यांनी संबोधी गायकवाड हिने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. कठोर सराव, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळेतील कराटे प्रशिक्षिका साक्षी तोरंगी यांनी देखील रौप्यपदक मिळवून आपल्या कार्याची चमक वाढवली आहे.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कराटे प्रशिक्षका साक्षी तोरंगी यांचे विशेष आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, नियमित प्रशिक्षण, प्रोत्साहन, तसेच तांत्रिक मार्गदर्शनामुळेच राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळाली.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांची क्षमता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन दिले, तसेच स्पर्धेपूर्वी त्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी करण्यावर विशेष भर दिला.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.पी. सौजन्या यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


























