पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक सत्यवान वाघमारे यांना पुणे येथील आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशनच्या वतीने सिने अभिनेञी नेहा पटेले व अपूर्वा परदेशी यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .सत्यवान वाघमारे यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सत्यवान वाघमारे यांना या अगोदर वामनदादा जीवन गौरव पुरस्कार व इतर तब्बल चार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बागल सर, स्थानिक स्कूल कमीटी, शाळा व्यवस्थापन समीती, पिलीव पञकार संघ, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
सत्यवान वाघमारे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करताना अभिनेञी नेहा पटेले व अपूर्वा परदेशी.























