दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन यांच्या ‘फाइटर’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून तो थक्क करणारा आहे. पाहा ‘फायटर’चा एकदम दमदार टीझर…
‘फायटर’ चित्रपटाच्या टीझरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि आता तो प्रदर्शित झाला आहे. दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन ही नवी जोडी या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टीझरमध्ये अनिल कपूरचीही झलक पाहायला मिळते. ‘फायटर’च्या १ मिनिट १३ सेकंदांच्या टीझरमध्ये फायटर डिझरची एरियल ॲक्शन पाहायला मिळते, जो पाहून अंगावर काटा येतो. शिवाय या टिझरचे संगीत फारच अप्रतिम आहे.
हृतिक – दीपिकाचा स्क्वाड्रन लीडर लूक
‘फाइटर’ एक ॲक्शन फिल्म आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन स्क्वाड्रन लीडर बनले आहेत. अनिल कपूर ग्रुप कॅप्टन समशेर पठानियाच्या भूमिकेत आहेत. अनिल कूपर सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यामध्ये रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत त्यांना खूप पसंती मिळतेय.
‘फायटर’चे बजेट
‘फायटर’चे बजेट सुमारे २५० कोटी रुपये आहे. हा सिनेमा २५ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले, या दिग्दर्शकाने यापूर्वी ‘पठाण’ आणि ‘वॉर’ यांसारखे दर्जेदार सिनेमे बनवले होते.
‘फायटर’ हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट
‘फायटर’ची कथा फायटर जेट्सभोवती फिरते. २०१९ मध्ये ‘वॉर’वर काम करताना सिद्धार्थ आनंदने या विषयावर चित्रपट बनवण्याचा विचार केला होता. ‘फायटर’ हा भारतातील पहिला एरियल ॲक्शन चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. या फ्रँचायझीचा हा पहिलाच चित्रपट आहे.
‘फायटर’बद्दल सिद्धार्थ आनंद यांनी केले भाष्य….
सिद्धार्थ आनंदला ‘फायटर’कडून खूप आशा आहे. तो म्हणाला होता की, आतापर्यंत प्रेक्षकांनी असे काही पाहिले नसेल जे ‘फायटर’मध्ये दाखवले जाईल. या चित्रपटातून त्यांनी अनेक नवीन गोष्टींचा शोध घेतला आहे. चित्रपटाची कथा सिद्धार्थ आनंद यांच्यासह माजी लष्करी अधिकारी आणि लेखक रॅमन छिब यांनी लिहिली आहे.