बार्शी – बार्शी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये महायुतीकडून नगराध्यक्षापदासाठी तेजस्विनी प्रशांत कथले यांनी आज अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतेही मोठे शक्तीप्रदर्शन न करता, त्या आणि त्यांचे पती माजी नगरसेवक प्रशांत कथले हे दोघेही साध्या गाडीने कार्यालयात दाखल झाले.
त्यांच्यासोबत माजी नगरसेवक विजयनाना राऊत, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, भाजप शहराध्यक्ष महावीर कदम आणि माजी नगरसेवक भारत पवार उपस्थित होते. अर्ज दाखल प्रक्रिया शांत, संयमी आणि शिस्तबद्ध स्वरुपात पार पडली.
तेजस्विनी कथले यांना सर्वसामान्यातील उमेदवार म्हणून पाहिले जात असून, त्यांचा साधेपणा आणि उपलब्धता यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. महिला नेतृत्व, विनम्र स्वभाव आणि अभ्यासू दृष्टिकोन अशा गुणांमुळे त्या नगराध्यक्षापदाच्या उमेदवारीत महत्त्वाच्या स्पर्धक ठरत आहेत. त्यांच्या शांत पण प्रभावी प्रवेशामुळे बार्शीच्या निवडणुकीत अर्थपूर्ण चर्चा सुरु झाल्या आहेत.


















