अक्कलकोट – अक्कलकोट नगरीचे माजी नगरसेवक तथा भाजपाचे युवा नेते मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या डिजिटल बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. लोकांच्या मनातील नगराध्यक्ष ही त्यांची छबी निर्माण झाली आहे . अक्कलकोट शहरात सर्वत्र फिक्स नगराध्यक्षचे बॅनर झळकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे . समर्थकांच्या या मागणीला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे .
माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानां शुभेच्छा देण्यासाठी उसळलेला जनसागर त्यांची वाढती लोकप्रियता जनतेमधील त्यांचे मोठे आदराचे स्थान याची झलक पहावयास मिळली . मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराकडून समर्थ का कडून नागरिकांच्या वतीन तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून डिजिटल फलक लावण्यात आले . अक्कलकोट शहरातील सर्वच प्रमुख चौकात मिलन दादा फिक्स नगराध्यक्षचे बॅनर झळकले आहेत. माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांना मानणारा युवावर्ग प्रचंड मोठा आहे. आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अक्कलकोट नगरीचे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे मिलन कल्याणशेट्टी प्रबळ दावेदार आहेत. मिलन कल्याणशेट्टी नगराध्यक्ष व्हावेत अशी इच्छा डिजीटल फलकाद्वारे मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे . मिलन कल्याणशेट्टी यांनी वाढविलेला जनसंपर्क , युवा वर्गात असणारी त्यांची लोकप्रियता , आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेली विकास कामे , सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असणारा जिव्हाळ्याचा संपर्क या बळावर मिलन कल्याणशेट्टी हे अक्कलकोट नगरीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आघाडीवर आहेत. मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेला जनसागर विरोधी पक्ष पुरता गार झाला आहे त्यांच्या सत्कारासाठी भाजपा पक्ष कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड तोबा गर्दी केली होती. मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्यात युवा वर्गासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यात उत्साह दिसत होता. मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट शहरात सर्वत्र फिक्स नगराध्यक्ष म्हणून डिजिटल बॅनर द्वारे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. मिलन कल्याणशेट्टी यांच्या फिक्स नगराध्यक्ष बॅनरची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या तरी भाजपात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मिलन कल्याणशेट्टी यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.


























