मुखेड – त्यागमुर्ती,महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर सार्वजानिक जयंती महोत्सव समिती मौजे बेटमोगरा ता.मुखेड जि.नांदेड
च्या वतीने शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ रोजी येथील धम्मशील बुद्धविहार बेटमोगरा येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेटमोगरा गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मष्णाजी देसाई तर प्रमुख पाहुणे शिवराज पाटील बेटमोगरेकर हे होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस विश्ववंदनीय महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न,
डॉ .बाबासाहेब आंबेडकर,त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना शिवराज पाटील,मष्णा बाऱ्हाळे,ललिताबाई सोनकांबळे,राम सोनकांबळे गुरुजी, बालाजी सोनकांबळे सह पत्रकार भारत सोनकांबळे इत्यादींच्या हस्ते,धूप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तदनंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील सह बुद्ध वंदना घेण्यात आली.या कार्यक्रमावेळी राम सोनकांबळे (गुरुजी), पत्रकार भारत सोनकांबळे यांनी रमाईच्या जीवनातील पैलूंवर व रमाबाईंच्या वैवाहिक जीवनाच्या प्रारंभीच्या काळात उपासमार, हालअपेष्टा, डोक्यावर शेण वाहून नेणे. दु:ख आणि दारिद्र्याचे जे प्रसंग ओढवले आपल्या ठायी असलेल्या जन्मजात मनोधैर्याने तोंड दिले. रमाबाईंनी आपल्या शालीनता आणि विनम्रतेला थोडही ढळू दिली नाही.
आयुष्यातील बहुतेक काळ रमाईने असहाय्य दारिद्र्यात काढले, त्यामुळे सर्व स्ञी वर्गाने रमाबाईंचा आदर्श आपल्या जिवनांत अंगीकारला पाहीजे असे यावेळी बोलताना आपले विचार व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात सायंकाळी ४ :०० वाजता त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या पुर्णाकृती प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान भव्य फटाक्यांची रोषणाई करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात भोजनदाने सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बेटमोगरा येथील रमाई फाऊंडेशन चे सचिव तथा पत्रकार भारत सोनकांबळे यानी केले.
या कार्यक्रमाला माजी ग्रा.पं.सदस्य ललिताबाई सोनकांबळे, निवृत्ती पोटफोडे,दिपक सोनकांबळे,दिलीप सोनकांबळे,मारोती गायकवाड (शाखाध्यक्ष वं.ब.आ.बेटमोगरा),भगवान सोनकांबळे,
आनंदा सोनकांबळे,अनिल सोनकांबळे,
दिलीप सोनकांबळे,दिपक सोनकांबळे,राजु वाघमारे, गोविंद सोनकांबळे,यादव सोनकांबळे,शिवाजी सोनकांबळे, हरी कांबळे,अशोक पोटफोडे,सतीश सोनकांबळे, शंकर सोनकांबळे,संघर्ष सोनकांबळे,कपिल सोनकांबळे, राहुल सोनकांबळे, रोशन सोनकांबळे, कुणाल सोनकांबळे,विनोद बकरे,रूक्माबाई सोनकांबळे,सागरबाई सोनकांबळे,रमाबाई सोनकांबळे,मंगल सोनकांबळे, संगीता सोनकांबळे,शांताबाई सोनकांबळे,
सागरबाई पोटफोडे,शिल्पा सोनकांबळे,
श्वेता भारत सोनकांबळे,अनिता सोनकांबळे,धम्मा बकरे,अंजनबाई सोनकांबळे,जिजाबाई सोनकांबळे,ज्योती सोनकांबळे,मिरा सोनकांबळे,गंगासागर सोनकांबळे,दीक्षा सोनकांबळे,सह उपासक उपासकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

























