पंढरपूर – ॲड.संगम मोरे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस 7 दिवस दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा पंढरपूर येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी सुनावलेली आहे.
ॲड.संगम मोरे हे धनश्री पतसंस्थेच्या पॅनलवर असून बँकेचे कोर्टातील कर्ज वसुलीचे दावे, दरखास्तीचे कामकाज ते बँकेचे वतीने पाहतात. मागील महिन्यात दि.15/9/2025 भाऊसाहेब हेंबाडे व गौतम जगताप यांनी मंगळवेढा कोर्ट आवारात येवून कोर्ट कॅन्टीन मध्ये जोरजोरात ओरडून ॲड.संगम मोरे यांना दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती व अंगावर धावून गेले होते. त्यानंतर ॲड.मोरे यांनी मंगळवेढा वकील संघाकडे तक्रारी अर्ज दिला होता व त्यानंतर मंगळवेढा पोलिस ठाण्यात सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपी भाऊसाहेब हेंबाडे यास दि.10 ऑक्टोंबर 2025 रोजी दुपारी 2 चे सुमारास पंढरपूर येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे कोर्टात स्पे. द. नं. 55/2016 चे कमी अटक वॉरंट असलेने अटक करून कोर्टात हजर केले होते. त्यानंतर पंढरपूर वकील संघानेदेखील ॲड.संगम मोरे यांना पाठिंबा देत सदर आरोपीचे कोणीही वकीलपत्र घ्यायचे नाही, असा ठराव करत मे. कोर्टाने सदर आरोपीस जास्तीत जास्त दिवाणी तुरुंगवासात ठेवण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी युक्तिवाद केला. वकीलावरील वाढते हल्ले रोखण्यासाठी आरोपींना कठोर शासन होणे गरजेचे असून कायद्याचा धाक अशा समाज विघातक लोकांना बसला पाहिजे असे मत व्यक्त करत, सदर आरोपीस जास्तीत जास्त दिवाणी तुरुंगवासात ठेवण्यासाठी युक्तिवाद केला. तदनंतर सदर युक्तिवाद ग्राह्य धरत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती .पाखले मॅडम यांचे कोर्टाने सदर आरोपीस सुमारे 7 दिवस दिवाणी तुरुंगवासात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.यावेळी पंढरपूर व मंगळवेढा वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड.विकास भोसले, उपाध्यक्ष संजय व्यवहारे, सचिव शरद पवार, सहसचिव गणेश चव्हाण, ॲड.वर्षा हिरणवाले ॲड.अक्षय लोकरे, ॲड.अर्जुन पाटील, ॲड.सिध्देश्वर चव्हाण, ॲड.विशाल कदम, ॲड. तुषार रोकडे, ॲड.दुर्गेश लखेरी, ॲड.विशाल पवार, ॲड.ओंकार लिगाडे पंढरपूर वकील संघाचे सर्व सदस्य व मंगळवेढा वकील संघाचे अध्यक्ष राजु शेख, उपाध्यक्ष ॲड.एम.डी.गायकवाड, ॲड.हवनाळे, ॲड.देशमुख, ॲड.मुल्ला, ॲड.सौरभ मोरे, ॲड.विकी मासाळ, ॲड.संगम मोरे व मंगळवेढा वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.