साऊथकडील सुपरस्टार यश आज ८ जानेवारी रोजी त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. केवळ साभथकडीलच नाही तर बॉलिवूड प्रेक्षक देखील त्याचे चाहते आहेत. पण आज त्याच्या वाढदिवसाला मोठे गालबोट लागले आहे.
साऊथकडील सुपरस्टार यशच्या वाढदिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या सेलिब्रेशनच्या तयारी करत असताना तीन चाहत्यांचा मृत्यू बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्याचे कट-आउट लावताना विजेचा धक्का लागून तिघांचाही मृत्यू झाला. तर आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
KGF फेम यशची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्यांचे लाखो आणि करोडो चाहते आहेत. ४ जानेवारी रोजी, अभिनेत्याने टॉक्सिक चित्रपटासाठी मिळालेल्या प्रतिसादासाठी सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार व्यक्त केले. तसेच यंदा वाढदिवसाला चाहत्यांना भेटू शकणार नसल्याचेही त्याने त्याचवेळी कळवलेले.
यशच्या चाहत्यांचा याठिकाणी मृत्यू
कर्नाटकातील गडग जिल्ह्यात एक अपघात झाला. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या फोटोचे कट आऊट लावत असताना विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणारे आणखी तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, याबाबत अधिक माहिती येणे अद्याप समोर आलेली नाही.
यशचे चित्रपट आणि खरे नाव
यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. त्याने २००७ मध्ये जंबडा हुडुगी या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्याने २००८ मध्ये रॉकी, २०१३ मध्ये गुगली आणि २०१४ मध्ये मि. आणि सौ. रामाचारीमध्ये काम केले. पण KGF Chapter १ ने तो जगभरात प्रसिद्ध झाला. यानंतर जेव्हा याच सिनेमाच्या दुसऱ्या भागानेही तुफान लोकप्रियता मिळवली.