सोलापूर – राज्यातील नामांकित शहरांमध्ये सोलापूर शहराचे नाव जोडले जाते. सोलापुरात यापूर्वी रेल्वेचे डीआरएम ऑफिस आहे. डाक विभागाचे विभागीय पोस्ट कार्यालय आहे. मुंबई आणि गोवा अशी विमानसेवा सुरू झाली आहे. सोलापूर शहरात पासपोर्ट ऑफिस असल्याने, सोलापूरसह कोल्हापूर, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, विविध जिल्ह्यातील नागरिक पासपोर्ट काढण्यासाठी सोलापूर शहरात येत आहेत. तेव्हा पासपोर्ट कार्यालयसमोर आल्यानंतर परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना सोलापूरच्या बकाल बेघरांचे दर्शन घडत आहे. पासपोर्ट ऑफिससमोर बसणाऱ्या बेघरांची वाढत चाललेल्या संख्येमुळे सोलापूरचे धार्मिक महत्त्व मातीमोल होत चालले आहे. याकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असून सोलापूरवासीयांनीच यावर आता तोडगा काढावा असा सूर आता ऐकण्यास मिळत आहे.
दरम्यान, पासपोर्ट ऑफिस सोलापुरात असल्याने सोलापूर जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यातील अनेक नागरिक सोलापुरात पासपोर्ट काढण्यासाठी दाखल होतात. पासपोर्ट काढण्याच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांना सोलापूरच्या धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे अनेक भाविक धार्मिकस्थळी भेट देत असल्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे सोलापूरमधील धार्मिक क्षेत्रांचा विकास होत आहे. अशा विकासाच्या परिस्थितीमध्ये सोलापूर शहरात बेघर आणि इतरत्र फिरणाऱ्या भिक्षेकरुंची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. त्यांच्या दयनीय अवस्थाकडे पाहिले असाता, परजिल्ह्यातील आलेल्या नागरिकांचा हिरमोड होताना दिसत आहे.
सोलापूरच्या विकासाला हे बाधक ठरत आहे.
सोलापूर शहरातील अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्था अशा बेघर आणि भिक्षेकरु लोकांना जेवण आणि पाणी मोफत आणून देतात. त्यामुळे निर्ढावलेल्या या बेघरांना कष्ट करण्यापेक्षा आयते जीवन जगण्याची तसेच व्यसन करण्याची सवय जडत आहे. पासपोर्ट काढण्याच्या निमित्ताने परजिल्ह्यातील अनेक नागरिक देवस्थानस भेटी देत असल्यामुळे सोलापूरच्या धार्मिक पर्यटनचा विकास होत आहे. दुसरीकडे मात्र बेघर आणि भिक्षेकरु यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सोलापूरच्या विकासाला बाधक ठरत आहे.
– सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते
एडवेंचर पार्क चकाचक पासपोर्ट ऑफिस कधी?
सोलापूर शहरात तयार झालेले एडवेंचर पार्क गेल्या अनेक दिवसापासून धुळखात पडून होते. हे एडवेंचर पार्क तयार करण्यासाठी महापालिकेने लाखोंची रक्कम खर्च केली.
अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एडवेंचर पार्क परिसर चकाचक झाले असून, हे पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र याच एडवेंचर पार्कच्या शेजारीच असणाऱ्या पासपोर्ट ऑफिसची अवस्था बकाल झाली आहे. मात्र येथे बेघर तसेच भिक्षेकरूंची संख्या असल्याने एडवेंचर पार्क चकाचक झाल्यानंतर पासपोर्ट ऑफिस कधी चकाचक करणार आहे.
– मयुर गवते, सामाजिक कार्यकर्ते

















