नायगांव / नांदेड – नरसी येथे आमदार राजेश पवार यांच्या उपस्थितीत झालेली कार्यकर्ता संवाद बैठक ‘संवाद’ नव्हे, तर ‘गटबाजीचा रंगमंच’ ठरल्याची चर्चा भाजपमध्ये जोर धरत आहे.जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते डावलले गेल्याने पक्षाच्या तळागाळातून नाराजीचा उमटलेला पाहायला मिळाला.
महिलांसाठी राखीव गट असूनही महिला कार्य कर्त्यांची उपस्थिती अत्यल्प, तर मंचावर फक्त आम दार समर्थकांचीच गर्दी यामुळे “हा पक्षाचा कार्यक्रम आहे की कौटुंबिक सोहळा?” असा सवाल येथील बैठकीतील कार्यकर्त्यांत निर्माण झाला.
बॅनरवर फक्त दोन इच्छुक दाम्पत्यांचे फोटो झळकल्याने अन्य उमेदवारांत संतापाचा स्फोट झाला.दरम्यान, माजी आमदार राम पाटील रातोळीकर आणि जिल्हाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीने नाराजीची छाया अधिक गडद झालेली पहायला मिळाली होती.
यावेळी कार्यकर्त्यांचे मत स्पष्ट “संवादा ऐवजी आत्मप्रदर्शनावर भर देणे म्हणजे पक्षाच्या पायावरच घाव घालणे होय “.असा राजकीय विश्लेषकांचा इशारा :हा असंतोष गांभीर्याने न घेतल्यास स्थानिक निवडणूकीत ह्याचे परिणाम उद्या भाजपला नक्कीच भोगावे लागू शकतात. नुकतीच मागील तीन दिवसांपूर्वी नरसी व मांजरम या दोन सर्कल मधील कार्यकर्त्यांची येथील शिवकृपा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकी वेळी ही बैठक अखेर “संवाद” नव्हे तर “संधी साधूवादाचे प्रतीक” ठरल्याचे पक्षात चर्चेचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.




















