सोलापूर – दिनांक 12/11/2025 रोजी सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र क्रिकेट पंच असोसिएशन चे चेअरमन अजय देशपांडे या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा सत्कार सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार टेळे यांनी केला.
पुढील पंचवार्षिक कार्यकारणी पुढील प्रमाणे घोषित करण्यात आली.अध्यक्ष : नंदकुमार टेळे, उपाध्यक्ष : अतिक शेख , सेक्रेटरी : नवीन माने, सह सेक्रेटरी :- प्रसाद शावांतुल खजिनदार: सूर्यकांत खंडेलवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्य म्हणून मुश्ताक खैराटकर,संदीप कुसेकर,विशाल कुलकर्णी,योगेश कोंपल,चिराज शहा, गेंनबा सुरवसे, यांची निवड करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अजय देशपांडे यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट अंपायर असोसिएशन च्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत असोसिएशन चे कौतुक करताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने घेतलेल्या पंच परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच असोसिएशन सदस्यांनी चांगले यश मिळल्याबद्दल असोसिएशनचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळात सोलापूर जिल्हा क्रिकेट पंच असोसिएशन च्या सदैव पाठीशी राहून वेळोवेळी मार्गदर्शन करत राहू असे सांगितले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या पंच परीक्षेमध्ये नवीन माने,अतिक शेख,चिराग शहा, आशिष जाधव यांनी स्टेट पॅनल पंच म्हणून तर गुणलेखक परीक्षेमध्ये गेनबा सुरवसे विशाल कुलकर्णी यांची A+ पॅनल स्कोरर तर नागप्पा सुर्गेहळ्ली व प्रसाद शावंतूल यांनी A पॅनल स्कोरर म्हणून यश मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच खजिनदार खंडेलवाल यांनी लेखा जोखा यांचे वचन केले. असोसिएशन च्या वतीने अध्यक्ष नंदकुमार टेळे यांनी सभेची सांगता करत आभार प्रदर्शन केले .यावेळी संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते .


















