पंढरपूर – येथील श्री. दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेचा ६४ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आई आणि वडिलांना समजून घेताना या विषयावर खूप छान प्रकारे व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना आई वडिलांचे महत्त्व सांगताना त्यांनी अनेक भावनिक दाखले दिले. आई वडिलांच्या काळजाचा तुकडा म्हणजे मुलगा किंवा मुलगी असते. आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला तोंड देत केवळ आपल्या मुलासाठी आई वडील कष्ट करून त्यांच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असतात. याची प्रत्येक मुला मुलीने जाणीव ठेवावी, मुलांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी पडू नये व मुलींनी देखील आपल्या आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल असे वागू नये असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुकाराम मस्के, एम.यू.जरे, ए.एस. चंदनशिवे, एम.बी.मुळे यांनी केले. कार्यक्रम मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. या वेळी संस्थेचे, सचिव ॲड. वैभव टोमके, खजिनदार सलीमभाई वडगावकर, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, अनिरुद्ध सालविठ्ठल, विजय माळवदकर हे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक विलास दराडे,पर्यवेक्षक अशोक पवार, मधुकर भोसले, ज्युनिअर विभाग प्रमुख विवेक चौगुले, तंत्र विभाग प्रमुख एन.टी.देवकते तसेच सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब करपे, एकनाथ शिंदे व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————–
चौकट : ( गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण )
प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदनजी क्षीरसागर हे होते. त्यांनी विवेक वर्धिनीतील विविध उपक्रमाचे कौतुक केले. प्रशालेच्या अहवालाचे वाचन करताना प्रशालेचे प्राचार्य डॉ. यू.आर.मुंढे यांनी सांगितले की, प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व शिस्तीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा केल्या आहेत. तसेच विविध शालेय गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवले जात आहेत. भविष्यात विवेक वर्धिनीचा विद्यार्थी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करेल अशा प्रकारची सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधा प्रशाला व कॉलेज मध्ये करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या अहवालात सांगितले.
———————–
चौकट : ( पालकांच्या गळापडून विद्यार्थी रडू लागले )
यावेळी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक व सर्व मान्यवर देखील भावनिक झाले होते. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या गळा पडून रडून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


























