जेऊर – शेटफळ तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमातून हुंडाबळी स्त्रीभ्रूण हत्या या संदर्भात केलेल्या समाजजागृती बरोबरच सादर केलेल्या विविध गीतांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलावडे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी केंद्रप्रमुख वंदना पांडव मुख्याध्यापक शिवाजी शिंदे बिजू रणसिंग महेश दगडे यांचे बरोबरच गावातील सरपंच उपसरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपट गीता बरोबरच गोंधळी गीत, पोतराज गीत भीमगीत लोकगीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या संभाजी महाराज बलिदान थरारक जिवंत देखावा कार्यक्रमाचे मुख्य अकर्षण ठरला यावेळी शाळेच्या विकासासाठी लोकांमधून 85 हजार रुपयांची बक्षीस रक्कम जमा झाली. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नंदकिशोर वलटे यांनी केले तर आभार गजेंद्र पोळ यांनी यांनी मांनले.


























