मुदखेड ता प्र
मुदखेड येथील प्रसिद्ध असलेल्या बैल बाजाराला दर वर्षी प्रमाणे याही तळ्याचे स्वरूप आलें आहे. त्यामुळे सन्मित्र कॉलनी, बापुसाहेब नगर भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या बैलबाजारात दरवर्षी पाणी साचत असते पण नगर पालिकेकडून त्याचा निचरा होण्यासाठी काहीच उपाय योजना होत नाही. त्यामुळे त्या परीसरात झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच वराह व भटक्या स्वाणांनी उच्छाद मांडला आहे. या साचलेल्या पाण्यामुळे जीव जंतू जसे की सर्प – घुशी यांचे प्रमाण दरवर्षीच वाढते.
आणि सर्वत्र घाण साचली जाते. त्यामुळे बाजूंच्या इमारतींना साचलेल्या पाण्यामुळे धोका निर्माण होतो आहे. या कडे नगर पालीके ने लक्ष देणे अपेक्षीत असून साचलेल्या पाण्याला वाट करून दिली तर उचित होईल अशीच अपेक्षा सर्वसामान्य माणूस व्यक्त करत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती कडून ही जागा नगर पालिके ने भाडे तत्वावर घेतली आहे. तसेच नगर पालिका या जागेची तहेबाजारी सुद्धा घेते. पण या साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील नागरीकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष देत नाही. साचलेल पाणी मुख्य नाल्या पर्यंत नेले तर हा त्रास कमी होईल. पावसाळ्याच्या दिवसांत बैल बाजाराला तळ्याचे स्वरूप आल्यामुळे परीसरात सर्वत्र घाण पसरली आहे. त्यामुळे रोगराई व वीचुं, सर्प, घुशी आणि वराह यांचा मुक्त संचार सुरु आहे. या कडे नगर पालिका लक्ष देईल अशी अपेक्षा येथील रहिवाशी करत आहेत.