सोलापूर – जुळे सोलापूर येथील चौधरी फौंडेशन च्या वतीने विलास चंद्र शहा प्रशालेच्या मैदानावर काल सायंकाळी स्वर ध्यास संगीत विद्यालय च्या वतीने गीत रामायणाच्या आणि शब्द प्रभू मा. विवेक जी घळसासी यांचे निरुपण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरवातीला वरुण राजाने उपस्थिती लावून आपला आशीर्वाद दिला होता.
लया कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र चे विश्वस्त श्री अमोल राजे भोसले यांची विशेष उपस्थिती लाभली होती. प्रमुख अतिथींचे स्वागत द्वारकाधीश मंदिर येथील भजनी मंडळाने अतिशय पारंपरिक भक्ती भावाने केले. त्यानंतर सर्व प्रमुख अतिथींचे सत्कार चौधरी फौंडेशन च्या वतीने केल्यावर गीतरामायण मधील गीतांनी आणि विवेक जी च्या रसाळ वाणीने श्रोते मंत्र मुग्ध झाले होते.
जवळपास तीन तासांचा हा स्वर सोहळा चालू होता. मधून मधून पावसाची हलकी सर आपली रसिकरुपी दाद देत होती. या कार्यक्रमास श्री प्रशांत बडवे, श्री शहाजी पवार साहेब, श्री हेमंतजी चौधरी सर द्वारकाधीश मंदीराचे श्री पाठक यांची विशेष उपस्थिती होती. चौधरी फौंडेशन च्या उपक्रमाचे जुळे सोलापूर परिसरात कौतुक होत आहे. चेतन चौधरी या तरुण समाज सेवकाचे सर्वांनी आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हर्षद चौधरी, राहुल महाजन, अक्षय चौधरी, आनंद धर्माधिकारी, दिनेश जानकर, गणेश उकिरडे आणि चौधरी फौंडेशन च्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले होते.