मंठ्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती यांची जयंती उत्साहात साजरी
—————————-
मंठा प्रतिनिधी: शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या उत्साहात (ता.1)गुरुवार रोजी साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सकाळी साठे नगर ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकपर्यंत ध्वजरॅली काढण्यात आली.यावेळी पो.नि.रविंद्र निकाळजे , दामोधर वाघमारे यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे , प्रा.आर. एस.गायकवाड, व्याख्येते प्रा.जितेंद्र जगताप , माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, मारोतराव खनपटे , मध्यवर्ती बँक शाखाधिकारी भगवानराव कांबळे, भूमी अभिलेख कार्यालयातील रणबावळे, प्रा.सोनाजी कामिटे याचबरोबर गटनेते अचित बोराडे,जे.के. कुरेशी, संचालक वैजनाथ बोराडे, प्रदीप बोराडे ,अरुण वाघमारे ,राजेश खंदारे, बाज पठाण, उबेद बागवान, प्रकाश घुले ,धुराजी कांबळे, रावसाहेब खरात , रंगनाथ वाटाणे, गंगाराम गवळी .
,रमेश आवारे,आर.डी.खंदारे,शरद मोरे यांची उपस्थिती होती.तसेच सांयकाळी लहुजी चौक ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण वाघमारे व आभार प्रदर्शन प्रकाश घुले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित खनपटे, आकाश खनपटे, सुमित खनपटे, महादेव घोडे, प्रफुल्ल वाघमारे ,सोमेश गायकवाड, लखन कांबळे, पिराजी पवळे, संदेश प्रधान ,आदर्श गायकवाड,
विजय चव्हाण ,संघदीप वाघमारे, आदित्य वाघमारे, सोहम खनपटे ,शेखर खनपटे, गौरव खनपटे, विष्णू खनपटे,अशिष पंडित ,माऊली खनपटे ,प्रदीप कांबळे , प्रभाकर खनपटे ,अजय गायकवाड,राजेश खनपटे ,भारत खनपटे, अशोक खनपटे, प्रभाकर खनपटे , राज खनपटे यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.