सोलापूर : तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मिल कामगारांच्या मुला मुलींसाठी दिवाळीचा फराळ आणि फटाके वाटप करण्यात आले. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांच्या वतीने मागील 7 वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येतो.
या कार्यक्रमाला भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आयोजक दिलीप कोल्हे, मंगला कोल्हे, सुरेखा रोडगे, भाऊ रोडगे, अंबादास करगुळे, नागेश खरात, अजय यादव, गणेश नरोटे, शिरीष गायकवाड, प्रकाश राठोड, मोनाली कोल्हे, मंगल डोंगरे, वनिता कदम, कविता चव्हाण, विजय सारडा आदी उपस्थित होते. यावेळी प्रारंभी तेजस्विनी संस्थेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकेत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे म्हणाले, मिल बंद पडल्यानंतर येथे हालाखीची परिस्थिती निर्माण झाली होती त्या वेळेस येथील पुरुष आणि महिला यांच्या हाताला रोजगार देण्याचे काम आम्ही केलं. दिवाळीच्या काळात मिल कामगारांच्या मुलांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी मागील सात वर्षा पासून दिवाळीचा फराळ आणि फटाके फोडून कामगारांच्या मुला समवेत आम्ही दिवाळी साजरी करतो असे मत व्यक्त केले.
प्रमुख मान्यवर भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, दिलीप भाऊ आणि मंगलाताई यांचे काम मी मागील अनेक वर्षा पासून पाहते. सत्ता असो वा नसो, नगरसेवक असो वा नसो, मिल कामगारांच्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलांसाठी त्यांचे काम नेहमी सुरू असते. आता ते भाजपमध्ये आहेत, कामगारांच्या चाळीचा प्रश्न येणाऱ्या काळात लवकरच मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिल कामगारांच्या मुलांना लाडू, चकली, चिवडा आधी फराळाचे वाटप करण्यात आले. यासह मिल कामगारांच्या मुला समवेत फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज घाडगे, रणजीत कोल्हे, मंगेश डोंगरे, साहिल पठाण, रोहन उडानशिवे, सतिश मस्के, राहुल काटे, कल्लप्पा कामाने, अतिश चव्हाण, पार्थ कोल्हे, किशोर साबळे, नितेश जेतीथोर, गणेश भोसले, आदि सह तेजस्विनी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कदम यांनी केले.


















