शेकापूर येथील बौध्द समजाने एक म्हणता दोन वेळा समाज मंदिराचे काम थांबवण्या करिता सार्वजनिक निवेदन देऊन सुद्धा काम सुरूच आहे
त्याबद्दल गावातील उपसरपंच म्हणतात की आपण ठराव घेतला आहे आपल्याला कोणीच रोखू शकत नाही समाजाची काही गरज नाही अश्या शब्दात बोलून समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणी ठराव घेतलेली जागा ही अत्यंत घाणेरडी असून जिथे सर्व गावातील लोक सौचालयास जातात आणि गावाच्या बाहेर जिथे एक नाला असून उद्या चालून जर तिथे काही अनावश्यक घटना घडली किव्हा समाज मंदिराची काही विटंबना झाली तर त्यास उपसरपंच व ग्रामसेवक जिम्मेदार राहतील का असा प्रश्न समाजाच्या मनात उपस्थित होत आहे. दलित वस्तीत रिकामी जागा उपलब्ध असून देखील जाणून बुजून ग्रामपंचायत चे काही कर्मचारी समाज मंदिर हे बाहेर घेत आहे.