अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोटी स्वामी दर्शनार्थ येणाऱ्या स्वामी भक्ताच्या संख्येत प्रचंड मोठया प्रमाणात वाढ होत आहे . ३१ डिसेंबरला शहरात बसस्थानक ते वटवृक्ष स्वामी मंदिर परिसरात येण्यासाठी प्रचंड वेळ व मोठी कसरत करावी लागल्याचे भाविकांनी तक्रार व्यक्त केली . शहरात
पालिका निवडणुक संपताच अतिक्रमण मोहिम तीव्र करण्यात आली आहे . अतिक्रमाण काढण्या संदर्भात ध्वनीवर्धकद्वारे सुचना व लेखी नोटीस देण्यात येत आहेत वटवृक्ष स्वामी मंदिर परिसरात बुधवारी मोहिम राबविण्यात आली . समाधी मठ परिसरात भाविकाना चालत जाणे देखील येत नाही . भाविकांची प्रचंड संख्या पाहता समाधी मठ परिसरात रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमण याकडे नगर पालिका प्रशासन कधी लक्ष देणार अशा भावना स्वामी भक्ता मधुन व्यक्त होत आहेत
तीर्थक्षेत्र अक्कलकोट महाराष्ट्रातील शिर्डी शेगाव पंढरपुर तुळजापुर नंतर अक्कलकोट असे टॉप फाईव्ह मध्ये गणले जात आहे . दिवसा गाणिक अक्कलकोटी येणाऱ्या भाविक पर्यटकाची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे . यामुळे येथील रस्ते मोठी रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमण तात्काळ दुर करणे गरजेचे बनले आहे पालिका निवडणुक संपताच अतिक्रमण विरोधात मोहिम तीव्र करण्यात आली आहे शहरात ध्वनी वर्धका द्वारे सुचना देण्यात येत आहेत . बुधवारी वटवृक्ष मंदिर परिसरात मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला .
वटवृक्ष स्वामी मंदिरा बरोबर स्वामी समर्थ महाराजाच्या बुधवार पेठ येथील समाधी मठात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे मात्र समाधी मठात गर्दी काळात येण्याजाण्याकरिता वृद्ध भाविकांची लहान मुले यांची मोठी दमछाक होते रहदारीस अडथळा ठरणारी परिसरातील अतिक्रमणे दुर करावीत अशी भावना स्वामी भक्ता मधुन व्यक्त होत आहे .























