बार्शी – तालुक्यातील पानगाव गणातून शेतकरी पुत्र व पत्रकार किरण दत्तात्रय माने यांनी पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत (फेब्रुवारी २०२६) ते मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचे सांगितले.
किरण माने हे डिजिटल मीडिया संपादक असून, पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा सहसचिव पद भूषवितात. पत्रकारितेतील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, शेती आणि इतर समस्या समजून घेण्यात व त्यांचे निराकरण करण्यात ते निपुण आहेत. पत्रकार म्हणून अनेक वर्षे जनसामान्यांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. डिजिटल माध्यमांद्वारे जनजागृती केली आहे. आता पंचायत समिती सदस्य म्हणून प्रत्यक्ष प्रशासनात सहभागी होऊन सर्व समस्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील राहणार आहे, असे किरण माने यांनी उमेदवारी जाहीर करताना सांगितले.
किरण माने यांच्या प्रचार मोहिमेची सुरुवात लवकरच होणार असून, विकासाचे मुद्दे आणि जनसंपर्क यांना प्राधान्य दिले जाईल. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.
















