महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे
महाराष्ट्र मधील माता भगिनी या योजनेचा फायदा घेताना दिसत आहे या योजनेला ग्रामीण व शहरी भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात सदरील योजनेचा भव्य नोंदणी कॅम्प माननीय आमदार बबनराव जी लोणीकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वात मंठा येथे आयोजित केलेला आहे
याची आढावा बैठक श्री गणेश मंगल कार्यालय मंठा येथे पार पडली या बैठकीला आमदार बबनरावजी लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर यांनी मार्गदर्शन केले परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्व गावात जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत आमदार बबनरावजी लोणीकर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.