बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
वाशी येथे पूर्वी नावाजलेली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाशीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. पूर्वी वाशी हे भूम तालुक्यात होते भूम तालुक्यातील शैक्षणिक सुधारणा तसेच विविध ट्रेनिंग जिल्ह्याचे कोणतेही कार्यक्रम हे वाशीच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यक्रम घेत असत. एवढेच नाही तर एन.सी. ई.आर. टी. चा आठवड्याचा ट्रेनिंग चा कार्यक्रम वाशी येथे घेण्यात आला होता त्यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी तसेच संभाजीनगर विभागाचे सर्व एन. सी.आर. टी. चे मोठमोठे अधिकारी वाशी येथे कार्यक्रम घेऊन खुश होत होते. वाशी केंद्रीय शाळा पूर्वी चौथीपर्यंत होती
प्रत्येक वर्गाच्या चार चार तुकड्या होत्या त्यानंतर वाशी गावचे रहिवाशी असल्याले ४ ते ५ शिक्षक आल्यानंतर त्यांनी मा.जी. सरपंच भाई भगवानराव उंदरे यांना योग्य असे मार्गदर्शन करून केंद्रीय शाळांमध्ये सातवी पर्यंतचे वर्ग काढले त्यावेळी पाचवी ते सातवी वर्गाचे चार चार तुकड्या होत्या व शाळेत मुख्याध्यापकासह 25 शिक्षकांचा स्टाफ होता. अशाप्रकारे केंद्रीय प्राथमिक शाळा ही जिल्ह्यात एक प्रसिद्ध अशी शाळा होती. परंतु सध्या केंद्रीय प्राथमिक शाळा हे नाव सुधा राहिले नाही तर सातबारावर नोंद गोदाम एक शाळा अशी नोंद आहे. हा सर्व बदल केव्हा झाला? कोणी केला? याचे उत्तर मात्र समजून येत नाही २००१ पर्यंत केंद्रीय प्राथमिक शाळा हे नाव होते सध्याही केंद्रीय शाळा म्हणूनच ओळखली जाते.
परंतु 2002 नंतर मात्र नावात बदल झाला. शाळेतील सर्व वर्ग बंद पडले केवळ पहिली ते चौथीपर्यंत वर्ग राहिले असून सध्या ८६ विद्यार्थी व ५ शिक्षक शाळेत आहेत. ज्या शाळेत २८ तुकड्या होत्या त्या शाळेत फक्त 86 विद्यार्थी राहिले आहेत अशा अवस्थेला जबाबदार कोण? याची शिक्षण खात्याने दखल घेण्याची गरज असताना ते मात्र शाळा बंद कशी पडेल याकडे लक्ष देत आहेत सध्या या चार-पाच वर्षापासून शाळेचे वातावरण बदलू लागले आहे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होत आहेत शिक्षक स्टाफ मनापासून काम करत आहे व केंद्रीय प्राथमिक शाळा ही प्रगतीच्या मार्गावर येऊ लागली आहे एवढे असूनही सध्या रात्रीच्या वेळी काही टुकार कंपनी गावातील शाळेच्या व्हरांड्यात बसत असून ते पान व तंबाखू खाऊन थुंकलेले दिसत आहेत
सध्या शिक्षक पालक कमिटीचे अध्यक्ष हंसराज कवडे हे असून त्यांनीही घाण पाहून राग व्यक्त केला व शाळेची उर्जित अवस्था मागील सारखी आणण्यासाठी परिश्रम घेण्याचे ठरवले असून त्यांना गावातील काही लोकांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे केंद्रीय प्राथमिक शाळे शेजारी गटशिक्षण कार्यालय दिमाखात डौलत आहे. परंतु अधिकारी मात्र केंद्रीय प्राथमिक शाळेसाठी प्रगती पथावर नेण्यासाठी मनापासून बघत नसल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी ही पूर्वीचे वैभव प्राप्त करावे अशी नागरिकांची व पालकांची एकमुखी मागणी आहे.