Monday, April 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चंद्रभागा नदीची अवस्था दिवसेंदिवस भयावह होताना दिसतेय

तरुण भारतbyतरुण भारत
December 11, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर असे अभंगातून वर्णन असलेल्या चंद्रभागा नदीची अवस्था दिवसेंदिवस भयावह होत आहे. एकीकडे भाविक येथे आल्यावर याच चंद्रभागा नदीच्या पवित्र स्नानाचा आनंद लुटत असतात, ऐवढेच नाही तर गावाकडे परत जाताना हेच चंद्रभागेचे पवित्र जल तिर्थ म्हणून भाविक हौसेने नेत असतात. तर दुसरीकडे याच चंद्रभागा नदी पात्रात शहरातील ड्रेनेजचे मिसळणारे पाणी, सर्रास होणारे अस्थी विसर्जन, मृतदेहाला याच चंद्रभागेच्या पात्रातील पाण्यात स्नान घालणे, जनावरे धुणे असे सर्रास कार्यक्रम येथे सुरु असतात. या दूषित पाण्यामुळे भाविकांना वेगवेगळ्या साथीचे आजार केव्हाही उदभवु शकतात.

चंद्रभागा नदीचे प्रदूषण आणि स्वच्छते संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देषांची अंमलबजावणी केवळ आषाढी,कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रांच्या वेळीच प्रशासनाकडून केली जाते. मात्र इतर वेळचे काय ? असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यातील नव्हे तर देशातील प्रमुख तिर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरची ओळख आहे. या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर चंद्रभागा स्नानाला महत्व आहे. चंद्रभागेचे स्नान झाल्यानंतर प्रत्येक भाविक या नदीचे जल तिर्थ म्हणून प्राशन करतो. गंगे समान असलेल्या चंद्रभागेचे तिर्थ अनेक भाविक आपल्या घरी देखील घेऊन जात असतात. मात्र अशा या चंद्रभागा नदीची अवस्था दिवसेंदिवस प्रशासनाच्या उदासीनतेने बकाल होवू लागल्याचे दिसत आहे.


या नदीच्या विविध घाटांवर प्रदूषण व् स्वच्छतेबाबत नुसत्या फलकांवर सूचना लिहून कर्तव्य बजाविण्या पलिकडे प्रशासनाकडून काहीही केले जात नाही. बऱ्याच वेळा शहरातील ड्रेनेजचे पाणी चक्क नदी पात्रात मिसळत असते. शहरातील गवळीं बांधवांकडून नदी पात्रातच आपली जनावरे स्वच्छ केली जातात. नदीच्या वाळवंटातच सर्रास दशक्रिया विधी सुरु असल्याचे दिसते. मयत झालेल्या व्यक्तींचा मृतदेह चक्क नदी पात्रात बुडवून शेवटचे पवित्र स्नान घालण्याची परंपरा पाळल्याचे समाधान देखील शहरातील नागरिकांकडून आजही पार पाडले जात आहे. घरातील देवदेवतांच्या पुजेतून साठलेले निर्माल्य देखील सर्रास नदीपात्रातच टाकले जात आहे. 


या बरोबरच महिला वर्गाचे पात्रातील पाण्यात मनसोक्त कपडे धुणे, नदीच्या वाळवंटात अस्ताव्यस्त पसरलेल्या कपड्यांच्या चिंध्या, प्लाँस्टिकचे द्रोण,पत्रावळी, नारळाची केसरे, फुलांचे सुकलेले हार, देवदेवतांच्या दुभंगलेल्या मुर्तीचे ढिगारे पालिका केव्हा स्वच्छ करणार. गाढवा वरुन रात्री,अपरात्री नदी पात्रातील वाळू मुळे पात्राची होणारी चाळण महसूल खाते केव्हा थांबविणार असे चंद्रभागा नदीच्या पावित्र्य, प्रदूषण तसेच स्वच्छते संदर्भातील एक ना अनेक सवाल शहरातील सुज्ञ नागरिक, वारकरी भाविक तसेच महाराज मंडळींकडून उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र कार्यवाही मात्र शुन्य आहे.

Post Views: 34
Previous Post

महेश इंगळे यांच्या हस्ते राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे शुभारंभ

Next Post

शेटे वस्ती ब्रिज परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शेटे वस्ती ब्रिज परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

ताज्या बातम्या

खासदार श्रीकांत शिंदेनी घेतली कार्यकर्त्यांसोबत बैठक …

April 13, 2026

ॲसिड अपघातग्रस्त त्या तरुणीने स्वतःच फेकले स्वतःवर ॲसिड

April 13, 2026

वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा झाला सन्मान

April 13, 2026

सामाजिक चर्चासत्रांचे आयोजन

April 13, 2026

विजय चौकात गर्जले हिंदुत्ववादी विचार

April 13, 2026

दिमाखात बसवेश्वर महाराजांचा पुतळा विराजमान

April 13, 2026

रणबीर दाखल झाला नागपुरात आर आर एस एस मुख्यालयात

April 13, 2026

आता मुंबई -बंगळूरू धावणार स्लीपर वंदे भारत

April 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0807146

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697