अक्कलकोट – तालुक्यातील किरनल्ली येथील धोकादायक विहीरी वरील बांधकाम पडल्याने शाळेची मुले माणसं जनावरे यांना धोकादायक बनले आहे.
ग्रामपंचायत कडून या धोकायक विहिरी बाबत हालचाल होत नसल्याने ग्रामस्थ कडून संताप व्यक्त होत आहे.
किरनल्ली येथील जिल्हा परिषद शाळा आणि हनुमान मंदिराच्या समोरची धोकादायक विहीरी वरील बांधकाम पडल्याने रात्री अपरात्री अंधारात जनावरे, माणस,शाळेची मुले विहिरीत चुकुंन पडले तर यास जबाबदार कोण? या करिता सरपंच ग्रामपंचायत अधिकारी तात्काळ विहिरीचे बांधकाम करावी अशी मागणी गावकऱ्या कडून होत आहे.



















