वाशी – तालुक्यातील सटवाईवाडी येथील प्रदीप फरताडे यांच्या गाईने चक्क चार वासरांना जन्म दिल्याची दुर्मीळ आणि आनंददायी घटना घडली आहे. ग्रामीण भागात अत्यंत क्वचित घडणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
जन्मलेल्या सर्व चारही वासरांची प्रकृती उत्तम असून गाईची तब्येतही स्थिर असल्याची माहिती पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिली आहे. वासरांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून ही घटना शुभ मानली जात आहे. शेतकरी वर्गासाठी ही घटना आशेचा आणि आनंदाचा संदेश देणारी असून सटवाईवाडी गावात सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.


























