सोलापूर : पद्यशाली समाजाचे पितामह वैकुटवासी, विठोबा शिवव्या वड्डेपल्ली यांची पुण्यतिथी कार्यक्रम सालाबादप्रमाणे पद्यशाली शिक्षण संस्थेच्या वतीने बुधवार दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी शांती चौक (पॉलिटेकनीकल कॉलेज जवळ), अक्कलकोट रोड सोलापूर येथील वैकुटवासी विठोबा शिवय्या वड्डेपल्ली यांच्या अर्धपुतळयास पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड श्रीनिवास अं. क्यातम, उपाध्याक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम विश्वस्त सर्वश्री, दिनेश यन्नम श्रीधर चिटयाल, व्यंकटेश आकेन, विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी वडेपल्ली कुटुंबियांच्या वतीने उपस्थित असलेले विठ्ठल वड्डेपल्ली व निशिकांत वड्डेपल्ली हर्षद व विहान वड्डेपल्ली, शिवकुमार महांकाळ, श्याम देवरकोंडा, गोविंद जटला याचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
वैकुटवासी विठोबा वड्डेपल्ली कुटूंबियाकडून समाज व शिक्षण संस्थेच्या सर्वांगीन विकासासाठी केलेल्या कार्याचा संस्थेच्या वतीने अॅड श्रीनिवास क्यातम यांनी त्यांनी तेलंगाना सोडून संपूर्ण भारत देशात सर्वत्र निघून गेले .परंतु सोलापूरमध्ये आश्रय दिलेले दैवत कै. विठोबा वड्डेपल्ली यांनी १९१८ साली त्याच्या राहात्या घरी जेथे कौंतम चौकात वड्डेपल्ली वखार होता. त्या ठिकाणी राहयला दिल्यानंतर त्यांनी अनेकाना तब्बल ९ महिने आश्रय दिला व त्यांना त्यांच्या पोटा पाण्याचा व्यवस्था केली. त्यानंतर त्यांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचे कळले तेव्हा त्यानी त्याचे स्वतः चे राहते घर हे अशिकल मैदान येथे अशा महान व्यक्तींच्या घरात शिक्षण संस्थाची स्थापना झाली .या वटवृक्षाची ओघ सुरु झाला. आपल्या संस्थेच्या २८ शाखा व १५००० हजार विद्यार्थी आहेत. गेल्या ११८ वर्षांच्या इतिहास सांगतो त्याचा मानकरी हे कै. विठोबा शिवय्या वड्डेपल्ली हे आहेत व त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचा आपण सर्वांनी हदयापासून सन्मान राखणे व हृदयापासून वंदन करणे हे आपले परमकर्तव्य आहे. त्या शिवाय त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था असो किंवा ज्ञाती संस्था असो कुठलेही पद घेण्याचे आपले पात्रता नाही. असा भावना माझ्या मनात आहे. त्यामुळे आपल्या समाज बांधवांनी या सहा लाख लोकसंख्या आहे. या सहालाख लोकसंख्या असलेल्या समाजाच्या पूर्वजांना त्यांनी राहयला घर दिले व पूर्वजांना रोजगार दिला अशा देवाचा पुण्यतिथी आहे. आपण सर्वांनी आपले कर्तव्य म्हणून हा कार्यक्रम साजरा करावा आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात या महानुभवाचा फोटो ठेवावा जेणे करुन आपल्याला आपले पूर्वजांनी केलेले कार्याची आठवण व्हावी अशा भावना व्यक्त करतो, असे गौरव उदगार काढले.
या कार्यक्रम प्रसंगी पद्यशाली शिक्षण संस्थेचे उपाध्याक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, विश्वस्त सर्वश्री, दिनेश यन्नम, श्रीधर चिटयाल, व्यंकटेश आकेन, विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा तसेच कुचन प्रशालेचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर व वड्डेपल्ली कुटूंबिय उपस्थित होते, सर्व उपस्थितीतांचे संस्थेचे उपाध्यक्ष प्रा श्रीनिवास कोंडी यांनी आभार मानले.


























