सोलापूर : उसतोडीसाठी यवतमाळ येथून उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे आलेल्या तरुणाचा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊन मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री झोपलेला तरुण शनिवारी सकाळी झोपेतून उठलाच नाही. मानलेल्या आईने आणि भावाने त्यास उपचारास दाखल केले होते.
विक्रम अनिल राठोड (वय 25 , रा. शिवणी ता घाटांनी जि यवतमाळ) असे तरुणाचे नाव आहे. विक्रम हा काही दिवसांपूर्वी मानलेली आई अनुसया नाबुळकर यांच्यासह डोणगाव येथे उसतोडीसाठी आला होता. तो डोणगाव येथील शेतकरी नंदकुमार संभाजी गायकवाड यांच्या शेतात झोपला होता. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यास अनुसया या उठविण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु तो उठत नसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर हवालदार कुंभार यांनी त्यास यादीसह शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.


















