वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे दिवाळी सणानिमित्त बाजार फुलून दिसत आहे. शिवारात दहा खेड्यामध्ये केंद्रबिंदू मानले जाणारा वळसंग बाजार दिवाळीसाठी आकाश दिवे व अनेक रोषणाई दिव्या सकट बाजार सजावट केले आहे.
किराणा व भुसार व्यापारी दुकानात मात्र गर्दी कमी दिसत आहे. कारण शेतकऱ्यांची झालेले अतिवृष्टीमुळे पिकांची नुकसान व्यापारीवर फटका बसल्याची माहिती सिद्धाराम चिंचोळी यांनी व्यापार कमी असल्याची सांगितले. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई चे पैसे खात्यावर येतील या आशेवर शेतकऱ्यांना निराश केली आहे. आकाश दिवे व विद्युत रोषणाई वस्तूंची विक्री कमी झाल्याची संदीप वरडोळे यांनी सांगितले.दिवाळी पाडव्याच्या आधी खातेवर पैसे जमा होतील का ? शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करण्यासाठी सरकार मदत करतील का ? अशाप्रकारे अनेक प्रश्न शेतकरी करत आहे.
जीएसटी मुळे वस्तूंचे भाव कमी झाले तरी खरेदी करण्याचे उत्साह ग्राहक मध्ये दिसत नाही.
मध्यमवर्गीय, श्रीमंत व सरकारी नोकरदाराकडून व्यापार होत असल्याची माहिती फटाके विक्रेता गुरुनाथ दुधगी यांनी दिले.