कुर्डुवाडी – महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कुर्डुवाडी येथील शोध कला, क्रीडा व सामाजिक संस्थेच्या ‘मी देव’ नाटकाला राज्यस्तरीय पातळीवर मोठे यश मिळाले. या स्पर्धेत या नाटकाला एकूण पाच विविध पुरस्कार सोबतच डॉ. संतोष सुर्वे यांना अभिनयासाठी सर्वोच्च रौप्य पदकही मिळाले.
नुकत्याच सोलापूर केंद्र येथे आयोजित या नाट्य स्पर्धेत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण १८ संघांनी भाग घेतला होता. प्रा. रविशंकर झिंगरे लिखित ‘मी देव’ नाटकात बाळकृष्ण निमसुडकर यांना नेपथ्य विभागात प्रथम पारितोषिक, ऋतीक गायकवाड यांना संगीत क्षेत्रात प्रथम पारितोषिक, तर दिग्दर्शनासाठी डॉ. सायली सुर्वे यांना तृतीय पारितोषिक मिळाले. नाटकास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.‘मी देव’ या नाटकात आस्तिक आणि नास्तिक या द्वंद्वातून अन्या (डॉ. संतोष सुर्वे) आणि सुन्या (संदीप शहा) यांच्या अभिनयाद्वारे देवाची प्रत्यक्ष भेट (बाळकृष्ण निमसुडकर) कशी होते, यावर आधारित कथानक प्रभावीरीत्या सादर करण्यात आले आहे.यशस्वी सादरीकरणासाठी डॉ. सचिन गोडसे, सूर्यकांत जाधव, उमा उमेश, प्रा. मोहन खरात, प्रमोद सुर्वे, अमोल कांबळे, मिठुमिया शेख, विनायक सुर्वे, गणेश भोगे, विनय दहिवाळ आणि लखन क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.
विशेष म्हणजे, डॉ. संतोष सुर्वे यांनी अभिनय क्षेत्रात हे अग्रगण्य बक्षीस आतापर्यंत चार वेळा जिंकले आहे. या कामगिरीमुळे संस्थेचे नाव महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यात प्रतिष्ठित झाले आहे.या यशामुळे कुर्डुवाडीतील नाट्यकलावंतांचे कौतुक होत असून, त्यांच्या पुढील कलात्मक कामगिरीस अत्यंत उत्साहाने पाहिले जात आहे.
चौकट—
सोलापूरच्या राज्य नाट्य स्पर्धेत महापारेशनच्या ” बरड ” नाटकातील सर्व कलाकार हे पुणे जिल्ह्यातील आहेत.त्या जिल्ह्यातही राज्य नाट्य स्पर्धा होते.मात्र त्याठीकाणी मोठी स्पर्धा असते.त्यामुळे तेथील कलाकारांनी महापारेशन संघामधून सोलापूरच्या स्पर्धेत भाग घेतला .त्यांच्या बरड नाटकाला प्रथम क्रमांक मीळाला.मात्र ग्रामीण भागातील या स्पर्धेमधे त्यांचा प्रथम क्रमांक आम्ही मानतच नाही. त्यांचा आम्ही निषेध करतो.त्यामुळे येथून पुढे सोलापूर केंद्रावर होणा-या नाटकावर सोलापूर केंद्रातीलच कलाकारांनी नाटक सादर करावे .ईतर कोणत्याही कलाकारांना सहभागी करून घेवू नये असा ठराव करण्यात आला असून राज्य नाट्य स्पर्धेचा समन्वयक देखील बदलण्यात यावा अशी मागणी केली आहे.
सर्व कलाकारांच्या उपस्थीतीत झालेल्या ठरावाचे निवेदन सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांना देण्यात येणार आहे.
डाँ.संतोष सुर्वे.
कुर्डूवाडी.ता माढा.
कलाकार ” मी देव “
रौप्य पदक विजेते
















