लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाउन सुरू झाले असून मंगळवार ४ जून रोजी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल ९०० पेक्षा अधिक उमेदवारांच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. त्याआधी शनिवार, १ जून रोजी देशभरातील सर्व एक्झिट पोलने यावेळी निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी पुन्हा सत्तेत पूर्ण बहुमताने परतेल असे भाकीत केले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एनडीए ४०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाज अनेक एक्झिट पोलने वर्तवला.
एक्झिट पोलच्या निकालांनी शेअर बाजार बहरला
दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सोमवरी, बाजाराच्या सुरुवातीला जबरदस्त उत्साह दिसून आला. बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल २,००० अंकांची गरुड भरारी घेतली तर निफ्टीमध्येही ८०० पेक्षा अधिक अंकांची तेजी नोंदवली गेली. सोमवारी, सकाळपासून बाजारातून मिळालेल्या उत्कृष्ट संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार एक्झिट पोलच्या अंदाजानुसार खूप उत्साही दिसत असून यामुळे गिफ्ट निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर वधारला. याशिवाय, वास्तविक निकाल एक्झिट पोलच्या निकालांसारखेच असेल तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अनेक कंपन्यांना मोठी चालना मिळण्याची शक्य असून शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे बंपर कमाई करू शकतात.
मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात कोणाला फायदा
भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांनुसार सरकारचा भर भांडवली खर्चावर असेल, म्हणजे पायाभूत सुविधांशी संबंधित क्षेत्रांना फायदा होईल ज्याचा फायदा उद्योग, भांडवली वस्तू, उपयुक्तता, संरक्षण, सिमेंट आणि रिअल इस्टेट इत्यादींना होईल. भाजपच्या जाहीरनाम्यात रेल्वे, ग्रीन हायड्रोजन, सौर, आण्विक, पवन ऊर्जा, विमान वाहतूक, संरक्षण आणि सेमीकंडक्टर्सशी संबंधित उद्योगांमध्ये पीएलआयवर लक्ष केंद्रित करण्याविषयी सांगितले असून मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास देशातील कॅपेक्सला चालना मिळू शकते.
मोदी 3.0 मध्ये कोणत्या शेअर्सवर ठेवाल लक्ष
ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने ५४ कंपन्यांची लिस्ट जारी केली केली ज्यांना मोदी सरकारच्या धोरणांचा पुन्हा फायदा होऊ शकतो. यापैकी निम्म्याहून अधिक PSU म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्या असून गेल्या आर्थिक वर्षापासून चांगला नफा कमावला आहे.
- संरक्षण आणि उत्पादन क्षेत्रातील HAL, हिंदुस्थान कॉपर, नाल्को, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कमिन्स इंडिया, सीमेन्स, एबीबी इंडिया, सेल, भेल, भारत फोर्जवर गुंतवणूकदार लक्ष ठेवून राहू शकतात.
- याशिवाय पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रात इंडस टॉवर्स, GMR विमानतळ, IRCTC, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लाभार्थी ठरू शकतात.
- एनटीपीसी, एनएचपीसी, पीएफसी, आरईसी, टाटा पॉवर, एचपीसीएल, गेल, जेएसपीएल, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, ओएनजीसी, कोल इंडिया, IOCL, पेट्रोनेट एलएनजी, बीपीसीएल यासारख्या ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्रातील अनेक कंपन्यांना मोदींच्या धोरणांचा फायदा झाला आहे.
- त्याचवेळी, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात SBI, PNB, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदाच्या नावाचाही समावेश आहे.
- दूरसंचार क्षेत्रात भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया, इंडस टॉवर्स
- मोदी सरकारच्या धोरणाचा फायदा झालेल्या कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट्स, ACC, इंडियन हॉटेल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, द इंडिया सिमेंट्स, दालमिया भारत, द रामको सिमेंट्स यांचा समावेश आहे.
बाजार तज्ञ काय म्हणतात
जागतिक ब्रोकरेज CLSA ने जारी केलेल्या कंपन्यांपैकी, L&T, NTPC, NHPC, PFC, ONGC, IGL, MGL, भारती एअरटेल, इंडस टॉवर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यासह काही शेअर्सना बाजार तज्ञांनी पसंती व्यक्त केली आहे.