बिलोली / नांदेड – बिलोली तालुक्यातील सगरोळी व सगरोळी परिसरात जबरदस्तीने विद्युत विभाग स्मार्ट मिटर बसवले आहे सदरील स्मार्ट मिटर सुरुवातीच्या दोन महीने कमी रिडीग पळत आहे दोन महीन्याच नंतर तेच मिटरचे रिडींग डबल होत आहे या मुळे विद्युत ग्राहकांच्या मनात स्मार्ट मिटर संबधात संशय आहे आनेक ग्राहकांना पच्चावन हजार,एकत्तीस हजार,आठ्ठावीस हजार बिले देण्यात आले.
दोन फॅन दोन ब्लफ असलेल्या ग्राहकाला एवढे मोठी रक्कम असलेले बिले येत आहेत या मुळे आनेक विज ग्राहाक विद्युत विभागाच्या अधिकारी समोर रोष वैक्त केले आहे. विज ग्राहकांचे मिटर तापसानी करुन जास्तीचे येत असलेले विज बिल आठ दिवसात कमी करुन देण्याच्या अश्वासना नंतर सगरोळी परिवर्तन समीतीच्या वतीने चालु असलेले अंदोल स्थगीत करण्यात आले आहे.
या वेळी विश्वनाथ समन,शंकर महाजन,शिवकुमार बाबणे,प्रभु मुत्तेपोड,बाबु उस्केलवार,सुनिल खिरप्पावार,राजु बामने, शेख मुर्तृज,सचिन कल्लोड,आदिनाथ बाबणे,बाबु पिंजारी,बसस्वेश्वर मुगळे,पांडुरग इबीतवार,विजय शिंदे,वैभव भोसले, संजय पद्दमवार,कोडलांडे नागोराव सह शेकडो नागरीक उपस्थीत होते.
यानंतर विज ग्राहकास विद्युत विभागाकडुन आर्थिक पिळवनुक न थाबवल्यास पुढील काळत या पेक्षाही तिव्र जनअंदोलन करण्याचा ईशारा सगरोळी परिवर्तन समीतीकडुन देण्यात आले आहे.



















