धाराशिव – तांदुळवाडी तालुका वाशी येथे मंगळवार दिनांक २५-११-२०२५ ते गुरुवार २७-११-२०२५ पर्यंत तीन दिवस खंडोबा यात्रा भरणार असल्याने तांदुळवाडी चे नागरीक बालद्व तसेच महिला सह सर्वजण अत्यंत उत्साहात सहभाग घेत आहेत.
मंगळवार दिनांक २५ रोजी काळी मैना फेम म्हाळसाकांत जागरण गोंधळ कार्यक्रम रात्री ८:३० झालेला आहे.

बुधवारी दुपारी १२:३० वाजता श्री खंडोबा नैवेद्य कार्यक्रम व रात्री रंगबहार आर्केस्ट्रा टेंभुर्णी अब्दुल भाई मुलानी यांचा होणार आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता जांगी कुस्त्याचा आखाडा भरणार असून पहिलवानास मोठ्या प्रमाणात बक्षीसे वाटप केली जातात. त्यामुळे मोठ-मोठे पहिलवानास हजेरी लावतात. कुस्त्या संपल्यानंतर रात्री आठ तीस वाजता झी टॉकीज फेम ह.भ.प. भारुड रत्न कृष्णा महाराज जोगदंड खामखेडा लातूर यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. तरी खंडोबा यात्रेसाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे समस्त गावकरी मंडळ तांदळवाडी तालुका वाशी हे कळवितात.



















