सोलापूर : महापालिकेच्यावतीने उत्तर सदर बझार सी. स . नंबर टिपी 3, फायनल प्लॉट 51/4, घनाते गेलेक्स्सी येथील फ्रंट मर्जिन मधील 2 दुकाने व पार्किंग क्षेत्रातील 2 दुकाने पाडून टाकण्यात आली.
महानगरपालिका हद्दीमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबाबत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदेश दिले होते. या अनुषंगाने सोमवार, दि
3 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तर सदर बझार सी. स . नंबर, टिपी 3, फायनल प्लॉट 51/4 घनाते गेलेक्स्सी येथील फ्रंट मर्जिन मधील 2 दुकाने व पार्किंग क्षेत्रातील 2 दुकाने निष्कासित करण्यात आली. ही कारवाई उपसंचालक मनीष भिष्णूरकर, उपअभियंता नीलकंठ मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअभियंता तपन डंके, अतिक्रमण विभागाचे सहकार्याने नगर रचना कार्यालयाकडील सहायक अभियंता शकील शेख, कनिष्ठ अभियंता सलमान मणियार, अतिक्रमण विभागाकडील कनिष्ठ अभियंता सहाय्यक सुफियान पठाण व कनिष्ठ अभियंता दीपक कुंभारयांच्या पथकाने पार पाडली. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
सोलापूर शहरातील मिळकतदारांनी आपले मिळकतीवर अनधिकृत बांधकाम करू नये अन्यथा ती बांधकामे निष्कासित करण्यात येईल, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
















